Sunday, 30 December 2012

क्रिकेट वर बहिष्कार ...



मी सध्या चालू असलेली भारत पाकिस्तान क्रिकेट मालिका बघायची नाही अस ठरवलं आहे. 
ज्या देशातून आपल्या देशावर दहशदवादी हल्ले होतात त्या देशाच्या संघाला 'आमंत्रण देऊन' क्रिकेट कशाला खेळायला पाहिजे? आणि क्रिकेट मुळे दोन्ही देशातले संबंध सुधारतील अस मला तरी वाटत नाही.
विश्वकप किंवा अशी काही अनेक देशांची स्पर्धा असेल तर एकवेळ  मान्य की त्यामध्ये एकत्र सामने खेळावेच लागतील, त्या स्पर्धेचा नियम म्हणून. 
पण इथे मात्र BCCI केवळ स्वतः च्या फायद्यासाठी  अशा स्पर्धा आयोजित करते आणि यावर काही अपवाद वगळता कुठलेही राजकीय पक्ष आक्षेप घेत नाहीत.
अर्थात आपल्याकडचे सामान्य लोकही या गोष्टीचा फार काही विचार करत नाहीत असच दिसतं आहे. काल रात्री T २० सामन्याच्या वेळी टीव्ही च्या दुकानाबाहेराची गर्दी काही वेगळ सांगत नव्हती.
म्हणजे लोकांना केवळ करमणूक हवी आहे या ना त्या मार्गांनी. मग त्यापुढे राष्ट्रप्रेम, विवेक वगैरे गोष्टींना काही स्थान नाही. 
असो ... !!!

Sunday, 30 September 2012

गणपती बाप्पा मोरया...!!!

गणपती विसर्जनाच्या आजकालच्या मिरवणुका बघून (अशोक नायगावकरांच्या style मध्ये ) :

कसं म्हणजे आजकाल असं वेड्यासारख करतात सगळे जण ...
पूर्वी कस गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही म्हणायचो " गणपती चालले गावाला .. चैन पडेना आम्हाला "
आणि खरच चैन नाही पडायचं हो आम्हाला... फार वाईट वाटायचं ...
पण आजकालच्या या विसर्जनाच्या मिरवणुका बघा .. सगळ्यांना आगदी आनंद झालेला दिसतो ..
सगळे नाचत काय असतात .. प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावलेली काय असतात ..
कसं म्हणजे सगळ वेड्यासारखं ...
त्या तिवारींच्या श्वेताला कुणीतरी सांगितलं म्हणे की गणपतीच्या घरी होळी खेळत नाहीत ..
म्हणून मग ती विसर्जनाच्या दिवशीच होळी खेळायला लागली ...
कसं म्हणजे सगळ वेड्यासारखं ...
आता म्हणे बाप्पाच सांगणार आहे  ब्रम्हदेवाला की माणसाचं design थोड modify कर..
डोळे, तोंड याप्रमाणे कान पण बंद करता येतील अशी development कर...
कसं म्हणजे सगळ वेड्यासारखं ...

Thursday, 27 September 2012

असं का बुवा ?



प्रचलीत ईतिहास संशोधनाप्रमाणॆ माणूस आधी चार पायांवर चालत होता, मग दोन पायांवर चालू लागला.
मग कुटुंब, टोळी करत करत सामाजिक प्राणी झाला.
पुढे हत्यारांचा शोध लागला, मग शेती करु लागला. य़ातुन स्थिरता आल्यावर समाज बनला, त्याचं पुढे राज्य बनलं. त्यावरुन युद्ध झाली.

पण या सगळ्यासाठी हजरो वर्ष जावी लागली. मात्रं गेल्या २-३ शतकांमधे माणसाने जी प्रगती केली आहे ती फारच विलक्षण आहे. खासकरुन त्या प्रगतीचा वेग फारच अफाट आहे.

त्यातही विजेचा शोध हा या सगळ्या प्रगतीमधे फारच महत्वाचा वाटतो मला. कारण पुढचे सगळे शोध, औद्योगीकरण, वाहतूक, ईलेक्ट्रॊनिक्स, अंतराळ, वैद्यक हे सगळे विजेशिवाय अशक्य होते.

आपण गेल्या कित्येक हजार वर्षांचा ईतिहास पाहिला, तर त्यात अतिशय भरभराटीला आलेली राज्य, संस्कॄती होती. परंतु त्यातही कोणाला रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी तेला तुपाच्या दिव्यापुढे जावे असे वाटले नाही, या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं, नाही?
कोणाला असं वाटलचं नसेल का, की याबाबत काही शोध लावावा ?

अहो, आपल्या पुराणातील सर्व घटना खर्या घडल्या असतील असं मानलं (त्यातील सर्व चमत्कारांसह) तरी त्यातदेखील विजेबद्दल काहीही उल्लेख नाहीच की. म्हणजे जेवायला द्रौपदीची थाळी असू दे किंवा फिरायला पुष्पक विमान असू दे, सूर्यास्त झाला की जेवा आणि झोपा. विजेवर चालणारी टी. व्ही. वगैरे उपकरणॆ जाऊ द्या पण, रात्री साधा भरपूर प्रकाश देणारा दिवा तर शोधायला हवाच होता बुवा.

त्यामुळे ही विज शोधणार्यालाच आजच्या आधुनीक जीवनाचं श्रेय द्यायला पाहिजे आणि त्याला सलाम केला पाहिजे.